आरोग्य

मजबूत हाड होण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला कोणता धोका होतो…

कॅल्शियम हे एक असं खनिज आहे, जे हाडं आणि दातांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासह स्नायूंचे कार्य सुधारण्यासाठी मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी देखील कार्य करते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. दातही कमी वयात पडतात, किंवा दातांचा त्रास होऊ लागतो. यासह हृदयाचे आजार आणि शरीर थकल्यासारखे आणि अशक्त वाटू लागते. शरीराचे कार्य चांगले ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. परंतु काही लोकांसाठी, कॅल्शियम हानिकारक ठरू शकते. कॅल्शियमयुक्त पदार्थ नेमके कुणी खाऊ नये.

किडनी स्टोन: मेयो क्लिनिक या वेबसाईटनुसार, कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. किडनी स्टोन तयार होण्यासाठी खनिजांचा वापर होतो. सामान्य प्रकारचा किडनी स्टोन कॅल्शियम ऑक्सलेटपासून बनलेला असतो. अशा परिस्थितीत कॅल्शियमयुक्त जास्त पदार्थ खाऊ नये.

हायपर कॅल्सेमिया: हायपर कॅल्सेमिया ही अशी स्थिती आहे जिथे रक्तामध्ये खूप जास्त कॅल्शियम असते. हायपर क्लेसीमियाच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, जास्त तहान, वारंवार लघवी होणे ही समस्या निर्माण होते. ही समस्या कायम राहिल्यास, किडनीचे विकारही वाढतात. तुम्हाला हायपर क्लेसीमिया असल्यास किंवा तो होण्याचा धोका असल्यास, कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं टाळा.

सारकोइडोसिस: सारकोइडोसिस शरीराच्या जवळजवळ कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. हा आजार विशेषतः फुफ्फुस आणि लिम्फ नोड्सवर परिणाम करतो. यामध्ये विशेषतः रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढते. ज्यामुळे हायपरक्लेसीमिया होऊ शकतो. सारकोइडोसिस असलेल्या लोकांनी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं टाळावे.

हृदयरोग आणि एथेरोस्क्लेरोसिसग्रस्त रुग्ण: जास्त प्रमाणात कॅल्शियम घेतल्याने एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढू शकतो. ही अशी स्थिती आहे जिथे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होते, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडचण येते. शिवाय नसा कडक होण्याचा धोका वाढतो, अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

18 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

19 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

24 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago