आरोग्य

सकाळी सकाळी उठल्यानंतर उदास वाटणे, चिंता वाटणे अति विचार येण्यामागे कोणती कारणे असू शकतात

1) बायोलॉजिक कारणे…

शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा हार्मोन जास्त गतिशील असतो, यामुळे एंग्झायटी येऊ शकते.

2) एंग्झायटीचा आजार…

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुम्हाला एंग्झायटीचा आजार असू शकतो. जर सहा महिने नियमित तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चिंता किंवा ताण तणाव जाणवत असेल, तर ही एंग्झायटी आजाराची लक्षणे आहेत.

3) कमी झोप…

झोप नेहमी उत्तम असावी. नीट झोप झाली नाही तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला सकाळी एंग्झायटी जाणवू शकते.

4) कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन…

कॅफिनयुक्त पेय किंवा साखरेच्या अतिसेवनामुळे एंग्झायटीचा धोका वाढतो. काही रिसर्चमधून ही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन करू नये.

5) धूम्रपान किंवा मद्यपान…

अनेक रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, धूम्रपानामुळे किंवा मद्यपानामुळे एंग्झायटीचा धोका वाढू शकतो. सकाळी उठल्यानंतर यामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो.

6) आजारी असाल तर…

जर तुम्ही आजारी असाल किंवा दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर अशा लोकांना एंग्झायटीची समस्या होऊ शकते.

7) दैनंदिन आयुष्यातील घडामोडी…

दैनंदिन आयुष्यातील घडामोडींचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही परिणाम जाणवतात. घर बदलणे, नोकरी बदलणे, कामाच्या ठिकाणी तणाव, मानसिक आणि शारीरिक अत्याचार, ब्रेकअप किंवा घटस्फोट, आर्थिक अडचणी, नातेसंबंधात तणाव इत्यादी गोष्टींमुळे एंग्झायटी जाणवू शकते.

एंग्झायटीचा सामना कसा करायचा…

कॅफिन, निकोटीन आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करा.

चांगला आरोग्यदायी नाश्ता करा.

आराम करा.

चांगली झोप घ्या.

लवकर झोपण्याची सवय लावा.

दररोजचे वेळापत्रक बनवा.

नियमित व्यायाम करा.

तणावाची परिस्थिती नीट हाताळा.

नकारात्मक विचार दूर ठेवा.

सकारात्मक विचार करणारांसोबत रहा.

छंद जोपासा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

9 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

24 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago