आरोग्य

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची असते. यापेक्षा कमी झोप घेतल्याने आरोग्य बिघडू शकतं. पण बरेच लोक यापेक्षा जास्त वेळ झोपतात. पण असं करणं त्यांच्यासाठी खूप जास्त घातक ठरू शकतं. जास्त वेळ झोपण्याचे काय वाईट परिणाम होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून अनेक गंभीर समस्यांपासून तुमचा बचाव होईल.

१) सतत डोकेदुखी

आपल्या शरीरात तयार होणारे सेरोटोनिन हार्मोन्स आपल्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या पॅटर्नला कंट्रोल करतात. जर तुम्ही खूप जास्त झोपत असाल तर, सेरोटोनिनवर याचा निगेटिव्ह इफेक्ट पडतो. याने न्यूरोट्रान्समीटर बाधित होतात. ज्यामुळे डोके दुखीची समस्या होऊ शकते. तेच तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला अचानक जास्त भूक आणि तहान लागू शकते. याने डोकेदुखी होऊ लागते.

२) नियमितपणे पाठदुखी

जर तुम्हाला उशीरापर्यंत झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला नेहमीच पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. मॅट्रेसची खराब क्वालिटीही याचं कारण असू शकते. अशात तर तुम्ही मॅट्रेसवर जास्त उशीरापर्यंत झोपत असाल तर याने मांसपेशींवर दबाव पडतो आणि अशाप्रकारे जास्त काळासाठी पाठदुखीचा त्रास होत राहतो.

३) डिप्रेशन-तणाव

उशीरापर्यंत झोपणं डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतं. जर तुम्ही उशीरापर्यंत झोपत असाल तर याने तुमचं डिप्रेशन आणखी वाढत जाणार. स्लीपिंग सायकल बिघडत असल्याने तुम्हाला सतत तणाव आणि मानसिक दबाव जाणवतो. याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडतो.

४) सतत थकवा

उशीरापर्यंत झोप घेत असल्याने फ्रेश वाटण्याऐवजी थकवा जास्त जाणवतो आणि जास्त वेळ झोपेतूनही तुम्हाला दिवसभर झोप येत राहते. हा जास्त झोपण्याचा एक साइड इफेक्ट आहे. बॉडी क्लॉक बिघडल्याने असं होत असतं. जास्त आरामामुळे मांसपेशी आकुंचन पावतात. याने थकवा जाणवतो.

५) डायबिटीस

जास्त वेळ झोपल्याने हार्मोन्सचं संतुलन शरीरात बिघडतं. इन्सुलिनला कंट्रोल करणारे हार्मोन्स याने जास्त प्रभावित होतात. थकवा जाणवत असल्याने शरीरात एनर्जीची कमतरता जाणवते आणि मग तुम्ही जंक फूड किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊ लागता. याने ब्लड शुगर लेव्हलही वाढते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago