मुख्य बातम्या

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे, उपाध्यक्षपदी सुनिल जिते आणि कार्याध्यक्षपदी अर्जुन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, राज्य उपाध्यक्ष अरुणकुमार मोटे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस फडके, जिल्हा संघटक साहेबराव लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. समीर राजे म्हणाले की, “पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. आर्थिक हितसंबंध जपण्याच्या प्रयत्नातून पत्रकारितेची स्वतंत्रता धोक्यात येते. लाचार पत्रकार कधीही निर्भीड पत्रकारिता करू शकत नाही.” ते पुढे म्हणाले की, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाल्यास संघटनेतील प्रत्येक सदस्याने त्या पत्रकाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. पत्रकार संघटना ही कोणताही दबावगट नसून एक कुटुंब आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याच्या सुख-दुःखात संघटनेने सहभागी व्हावे.

शिरूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष : सागर रोकडे

उपाध्यक्ष : सुनिल जिते

सचिव : योगेश शेंडगे

कार्याध्यक्ष : अर्जुन शेळके

खजिनदार : ओंकार भोरडे

संपर्कप्रमुख : अक्षय टेमगिरे

कोषाध्यक्ष : किरण शेलार (पिंगळे)

प्रसिद्धीप्रमुख : आबासाहेब थोरात

शिरुर शहराध्यक्ष : निलेश काळे

सहसंपर्क प्रमुख : धनंजय साळवे

नियोजन समिती अध्यक्ष (पुणे जिल्हा) : प्रफुल्ल बोंबे

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना डॉ. समीर राजे यांनी तालुक्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारींची शहानिशा करून संबंधित पत्रकारांना संघटनेमार्फत सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सागर रोकडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात कार्यरत पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळा प्रशासन किंवा राजकीय व्यक्तींकडून पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago