आरोग्य

रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाल्ल्याने काय होत

बदलत्या वातावरणात सगळ्यांनाच सर्दी खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येऊ लागते आणि कशातही मन लागत नाही. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा. रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाण्याचे फायदे वाचाल तर रोज ओवा खाल.

रात्री ओवा खाण्याचे फायदे 

ओवा हा तसा प्रत्येक घरात असतो. लोक वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतात. कुणी पदार्थाला टेस्ट आणण्यासाठी तर कुणी जेवण झाल्यावर मुखवास म्हणून याचं सेवन करतात. ओवा उष्ण असतो, त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे याचं सेवन केलं तर सर्दी, खोकला लगेच दूर होऊ शकतो.

ओवा खाण्याची पद्धत 

ओव्याचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पदार्थात मिक्स करून करू शकता. तसेच काही हेल्थ एक्सपर्ट ओव्याचा चहा पिण्याचा सल्ला देतात. हा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकडून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्याल मध व लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने शरीराला उष्णता मिळेल आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतील. तसेच रात्रभर एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यात टाकून ठेवा. सकाळी हे पाणी सेवन करा आणि ओवा चावून खा.

ओवा खाण्याचे फायदे 

१) कोलेस्ट्रॉल कमी होत

ओव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यावर झालेल्या शोधातून समोर आलं की, यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

२) सर्दी-खोकल्यापासून बचाव

बदलत्या वातावरणात सर्दी, खोकला, ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्यापासून तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील. कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो.

३) पोट होईल साफ

ओव्याचा वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्हालाही पोट साफ होत नसल्याची समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा.

४) वजन कमी करण्यास मदत 

ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं. जे तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट करतं. जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं तेव्हा नवीन फॅट तयार होत नाही आणि जुनं फॅट सहजपणे बर्न होतं. त्यामुळे ओव्याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

५) वायरल इन्फेक्शनपासून बचाव 

ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणा पासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्शन पासून याने बचाव केला जातो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago