आरोग्य

रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने काय होत, वाचाल तर रोज हा उपाय कराल

लिंबाचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. लोक लिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काही लोक रोज लिंबू पाणी पितात, तर काही लोक लिंबाचा रस वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकतात. पण आज लिंबाचा एक वेगळाच उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रोज आंघोळीच्या पाण्यातही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसाने आपल्या शरीरावरील इन्फेक्शन, धूळ, माती डाग दूर होतात. तसेच याने तुम्हाला त्वचेसंबंधी अनेक समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ याचे फायदे.

1) तेलकट त्वचेपासून सुटका

काही लोकांची त्वचा ही तेलकट असते. चेहऱ्या सतत तेल येतं. ही समस्या दूर करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. जर आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस टाकला तर ही समस्या दूर होईल. तसेच त्वचेवरील डाग, पिंपल्सही दूर होण्यास मदत मिळेल.

२) त्वचेसाठी फायदेशीर

आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकणे हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोक हा उपाय वापरतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. अशात केमिकलयुक्त साबणा ऐवजी लिंबाच्या रसाच्या रसाचा वापर करू शकता.

३) सुरकुत्यासाठी होतील दूर

आपलं शरीर एका इंजिनसारखं असतं. जसे आपण एखादी गाडी खरेदी करतो, तेव्हा ती सुरूवातीला चांगला मायलेज देते आणि वेळेनुसार तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती खराब होते. त्याच प्रमाणे आपल्या त्वचेचं आहे. वाढत्या वयासोबत जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगलं पौष्टिक आहार देत नाही तेव्हा त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. या ठीक करण्यासाठी तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकू शकता.

4) शरीराची दुर्गंधी होते दूर

वाढत्या वयासोबत वाढत्या वजनाचा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. जर कुणाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की, भविष्यात तुम्ही एखाद्या गंभीर आजाराचे शिकार होणार आहात. पण अनेकदा घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशात तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

10 तास ago