आरोग्य

जेवणाआधी की नंतर, कोणती आहे पाणी पिण्याची योग्य वेळ

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाची वेगवेगळी उत्तर आहेत. वेगवेगळ्या गोष्टींचे संदर्भ देऊन लोक वेगवेगळी उत्तरं देतात. कुणी सांगतं की, जेवणाआधी पाणी प्यावं, तर कुणी सांगतं की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. काही लोक असंही सांगतात की, जेवणानंतर दोन तास पाणी पिऊ नये. एक असाही सूर ऐकायला मिळतो की, जेव्हा तहान लागेल ती पाणी पिण्याची योग्य वेळ. अशात ही वेगवेगळी उत्तर ऐकून अनेकांच्या मनात येत असेल की, पाणी प्यावं तर कधी प्याव.

काय आहे पाणी पिण्याची योग्य वेळ

अ‍ॅलोपॅथीनुसार पाणी पिण्याची योग्य वेळ

जेवण आणि पाणी पिण्याचा आपसात काहीच संबंध नाही. मॉडर्न मेडिसिनमध्ये अशी काही मान्यता नाही. एक व्यक्ती साधारणपणे २५० ग्रॅम ते ३५० ग्रॅम इतकं जेवण करते. आपल्या पोटाची कॅपेसिटी यापेक्षा जास्त असते. त्यामुळे पोटात पाण्यासाठी भरपूर जागा असते. जेव्हा अन्नानं पोट भरतं आणि फुगतं तेव्हा मेंदुला संकेत मिळते की, आता कॅपेसिटी पूर्ण झाली आहे. तेव्हा मेंदू हा संकेत देतो की, आता जेवण बंद केलं पाहिजे. या स्थितीनंतरही १०० ते २०० मिली प्यायल्यावर काही फरक पडत नाही.

आयुर्वेद काय सांगत

जेवणाआधी किंवा नंतर पाणी पिण्याबाबत आयुर्वेदात वेगळा सल्ला दिला गेला आहे. आयुर्वेदात असं सांगितलं आहे की, जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. तसेच असंही सांगण्यात आलं आहे की, जेवणाआधी प्यायलेलं पाणी अमृत असतं. जेवणादरम्यान जर गरज पडली तर थोडं पाणी पिता येतं. या पाण्यानं आनंद मिळतो. पण जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पिणं काही लोकांसाठी विषासारखं असतं. त्यामुळे जेवणानंतर साधारण अर्ध्या तासानं पाणी प्यावं.

जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे नुकसान

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यानं पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. कारण जेवण झाल्यावर अन्न पचनासाठी तयार झालेली अग्नि लगेच पाणी प्यायल्यानं शांत होते. ज्यामुळे गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे अशा समस्या होतात. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यानं पचन तंत्रावर जो प्रभाव पडतो, त्यामुळे लवकर भूक लागू शकते. पुन्हा पुन्हा खाल्ल्यानं लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. असंही मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच पाणी प्याल तर अन्नातून मिळालेलं न्यूट्रिशन योग्यपणे अब्जॉर्ब होत नाही.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

जेवणानंतर सामान्यपणे अर्ध्या तासानंतर पाणी प्यावं. हा अंतर एक तासाचं असेल तर अधिक फायदा होईल. सोबतच पाणी एक एक घोट घेत प्यावं. ढसाढसा पाणी पिऊ नये. पाणी खाली बसून प्यावं. तेव्हा त्यातील मिनरल्स शरीराला मिळतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

10 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

14 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

14 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

14 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

14 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

14 तास ago