तळलेले पदार्थ खाणे आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. म्हणून हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कधी पापड-कुरडई, भजी, वडे, सामोसा, पुऱ्या असे काही ना काही आपण तळलेले खात असतो. बाहेर खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले म्हणून आपण हे पदार्थ घरी करतो. मात्र तळलेले जास्त खाणे चांगले नाही आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते असे वारंवार सांगितले जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पदार्थ तळताना आपल्याकडून नकळत काही चुका होतात. या चुका वेळीच लक्षात घेतल्या तर तळकट खाल्ल्याचा त्रास होणार नाही आणि तळलेले खाल्ल्याचा आनंदही घेता येईल.
पाहूयात या २ टिप्स कोणत्या
1) कढई किंवा तेल तापवण्याचे प्रमाण
एखादा पदार्थ तळण्यासाठी आपण कढई किंवा तेल किती प्रमाणात तापवतो हे लक्षात घेणे गरजेचे असते. यालाच इंग्रजीमध्ये स्मोक पॉईंट असे म्हणतात. स्निग्ध पदार्थ जास्त हिटवर तळू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की सगळेच स्निग्ध पदार्थ जास्त उष्णतेवर तळायला हवेत. पदार्थाचे स्वरुप, आकार यांचा अंदाज घेऊन कढईची आणि तेलाची उष्णता आपण ठरवायला हवी.
2) तेलाची निवड
तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रिया होते. त्याच तेलात तळलेले पदार्थ आपण खाल्ल्यावर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. त्यामुळे तेलाची निवड करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. तूप, खोबरेल तेल आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑईल हे तळण्यासाठी अतिशय उत्तम मानले जाणारे पदार्थ आहेत. याशिवाय सूर्यफूल, कॅनोला, सोयाबिन आणि इतर सर्व तेलांचे तळताना ऑक्सिडायजेशन होते आणि त्यातील हानिकारक रसायने आरोग्यासाठी घातक ठरतात.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…