आरोग्य

ज्वारी खाण्याचे फायदे

1) ज्वारीमुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. सध्या लठ्ठपणा ही मोठी समस्या आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. जेवणात ज्वारी असल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.

2) ऍनिमियामध्ये ज्वारीचा उपयोग होतो. ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. लाल पेशींची वाढ होते. अशा व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.

3) ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट भरते. शरीरास ऊर्जा मिळते. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असते. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. सध्या ब्लडप्रेशर आणि हृदयविकार वाढले आहेत. यासाठी आहारात रोज ज्वारी असावी.

४) ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्स असतात, फायबर्स असतात. यामधून शरीरास प्रोटीन्स मिळतात. फायबर्समुळे अन्नाचे पचन सहजतेने होते. आजारी व्यक्तीस दूध भाकरी द्यावी.

५) ज्वारीमुळे पोट साफ होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण ज्वारीमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात. अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी चपातीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी खावी. ज्वारीमुळे मुळव्याधीचा त्रास कमी होऊ शकतो.

६) ज्वारी पचायला हलकी असल्याने काविळीमध्ये उपयोगी ठरते. काविळ झाल्यावर व नंतर वर्षभर ज्वारीची भाकरी खावी. लिव्हरसाठी उपयुक्त ठरेल.

७) कॉलेस्ट्रॉल वाढले तर आरोग्याचे काही प्रश्न निर्माण होतात. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

८) सध्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या जीवनामुळे महिलांमध्ये विविध समस्या दिसतात. यामध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या दिसून येत आहेत. गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार यासाठी ज्वारी उपयोगी आहे.

९) ज्वारीत कर्करोगावर नियंत्रण ठेवणारे काही घटक असतात. त्यामुळे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी ज्वारीचा उपयोग होऊ शकतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

22 तास ago