आरोग्य

जखम झाल्यावर धनुर्वात प्रतिबंधक लस का देतात

जखम झाल्यावर धनुर्वात होऊ नये, यासाठी सर्वच डॉक्टर धनुर्वात प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन देतात. टिटॅनस टॉक्साईड व टीटीचे इंजेक्शन का देतात, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. जखम झाल्यानंतर त्यात रस्त्यावरची, घरातील, शेतातील माती वा इतर घाण जाऊ शकते. धनुर्वाताच्या जिवाणूच्या बीजावस्था (स्पोर) असतात. हे जंतू विपरीत अवस्थेत जिवंत राहण्यासाठी बीजावस्थेत जातात या अवस्थेत ते उष्णता, कोरडेपणा यांना सहजगत्या तोंड देऊ शकतात.

सुयोग्य वातावरण मिळाल्यास या बीजावस्थाचे रूपांतर धनुर्वाताच्या जंतूमध्ये होते. हे जंतू मग एक भयंकर विष निर्माण करतात. या विषाचा परिणाम मेंदूवर व स्नायूवर होतो. यामुळे धनुर्वात या रोगात स्नायू कडक होणे, शरीराची कमान होणे, दातखीळ बसणे, झटके येणे अशा गोष्टी पाहावयास मिळतात. या आजारात मृत्यूचे प्रमाण जरी आता खूप कमी झाले असले तरी, नवजात बालकांमध्ये मात्र मृत्यूचे प्रमाण ८० टक्के इतके आहे.

धनुर्वात होऊ नये, यावर एकमेव खात्रीलायक इलाज म्हणजे धनुर्वाताची लक्षणे ज्या विषामुळे दिसतात त्या विषाचा बीमोड करण्यासाठी प्रतिबंधक लस घेणे..ही लस घेतल्यानंतर सुमारे २१-३० दिवसांत आपल्या रक्तात धनुर्वाताच्या जंतूच्या विषाविरुद्ध कार्य करणारे प्रतिद्रव्य तयार होते. त्यामुळे धनुर्वात होणे टाळता येते. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे: ती म्हणजे, आज घेतलेल्या लसीचा उपयोग महिन्या भरानंतर होतो. धनुर्वाताचा अधिशयन काल काही दिवसांचाही असू शकतो. साहजिकच जखम झाल्यावर घेतलेल्या टीटीच्या लसीमुळे, त्या जखमेमुळे धनुर्वात होणार असेल तर फारसा उपयोग होत नाही. यासाठी काय करावे?

लहान मुलांना दीड महिन्यापासून त्रिगुणीच्या लसी द्याव्या. एखाद्याने कोणतीच लस घेतली नसेल, तर महिन्याच्या अंतराने टीटीची दोन इंजेक्शने द्यावी. त्यामुळे त्याला धनुर्वातापासून ५ वर्षे संरक्षण मिळेल. नंतर दर ५ ते १० वर्षांनी एक इंजेक्शन घ्यावे. अशा प्रकारे आपण केव्हाही होणाऱ्या जखमांपासून उद्भवू शकणाऱ्या धनुर्वाताचा प्रतिबंध करू शकतो. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी (शक्य असेल तेव्हा) बाळंतपणाच्या अपेक्षित तारखेच्या आधी सुमारे महिनाभर यासाठीच टीटीचे इंजेक्शन घेणे गरजेचे असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

4 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

5 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

5 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

5 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

5 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

7 तास ago