आरोग्य

गुळ का खाल्ला पाहिजे काय आहेत गुळाचे फायदे

साखरेचा वापर वाढल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले असून, आपल्या आहारातून साखर काढून टाकण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गूळ. आवड म्हणून साखर खाणे ठीक आहे, पण गरज म्हणून गुळाचा वापर वाढला तर जीवन आरोग्यदायी राहण्यास मदत होते. पण दुर्दैवाने गुळाचं मोठे उत्पादन होत असताना देखील आपल्या चहातून गूळ गायब झाला आहे.

साखर ही शरीराला हानिकारकच आहे, अनेक आजारांच मुळ हे साखरेतच दडले आहे. तरीही आपण साखर खाणे सोडत नाही. विशेष म्हणजे ‘कोल्हापुरी गुळा’ने जगाला भुरळ घातली आहे. पण येथील नागरिक त्याचा वापर फार कमी प्रमाणात करतात. साखरेच्या चहा ऐवजी गुळाचा चहा रोज घेतला तर तो आरोग्याच्यादृष्टीने अधिक फायदेशीर ठरतो. अलीकडे आहारातील गुळाचा वापर खूप कमी झाला आहे. ग्रामीण भागही त्याला अपवाद राहिलेला नाही. वर्षातून सणाला केल्या जाणाऱ्या पुरणपोळीमध्ये एवढाच काय तो गुळाचा वापर राहिला आहे. शहरात काही ठिकाणी तर पुरणपोळीत गुळाऐवजी साखरेचाच वापर केला जातो. पूर्वी पाहुणा घरी आला की चहा, सरबत ऐवजी गूळ शेंगा दिल्या जायच्या. आरोग्य सुदृढ ठेवायचे झाल्यास आपल्या रोजच्या जीवनात साखरेचे प्रमाण कमी करून गुळाचा सहभाग वाढविण्याची गरज आहे.

गूळ हृदयरोगासाठी एकदम उपयुक्त

हृदयाच्या आरोग्यासाठी गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे तसेच अँटिऑक्सिडंट्सच्या चांगुलपणाने भरलेले हे नैसर्गिक स्वीटनर आहे.

गुळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

गुळ दाहक-विरोधीदेखील आहे आणि रक्ताभिसरण वाढविण्यात मदत करतो.

सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.

गुळामध्ये व्हिटॅमिन सी, बी ६ आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. तसेच, यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.

विशेषतः शेतात काम करणाऱ्या महिलांनी रक्त वृद्धीसाठी गुळ खाणे फायदेशीर आहे.

गुळाच्या चहाचे स्टॉल

मोठ्या शहरात आता गुळाच्या चहाचे स्टॉल सुरु झाले आहेत. मात्र, अद्यापही लोकांमध्ये गुळाबाबत फारशी जागृती दिसत नाही. गूळ पिकविणारा शेतकरीही याबाबत सजग नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago