आरोग्य

ऐन तारुण्यात किडनी स्टोनचा त्रास का छळतो? ४ गोष्टी करा, किडनीचे आजार राहतात लांब

आपल्या शरीरात किडनी हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शरीरात असलेल्या अनावश्यक गोष्टी बाहेर फेकण्यास किडनी मदत करते. किडनी निरोगी असल्यास अनेक आजारांवर मात करता येऊ शकते. किडनीचे आजारही अनेकदा जीवघेणे ठरु शकतात. मुतखड्याचा त्रास आजकाल अनेकांना छळतो. अगदी तरुण वयातही मूतखड्यानं असह्य वेदना सहन करणारे आहेतच. किडनीचे आजार टाळायचे तर काही गोष्टी नियमित करायला हव्या.

काय नियमित करायला हव

भरपूर पाणी प्या: किडनीचे आरोग्य राखण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी विषारी पदार्थ फिल्टर करते आणि शरीर हायड्रेट ठेवते. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते.

धुम्रपान टाळा: धुम्रपान केल्यानं किडनीचं आरोग्य बिघडते. शिवाय किडनीचा कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. यासह हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही वाईट परिणाम होतात. कालांतराने किडनी खराब होऊ शकते.

वजन ठेवा आटोक्यात: वजन आटोक्यात ठेवणं आवश्यक. यामुळे किडनीसह हृदय निरोगी राहण्यासही मदत होते. वाढलेलं वजन अनेक समस्यांचं कारण ठरतं.

व्यायाम आवश्यक: धावणे, पोहणे, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, योगा, पायलेट्स आणि स्ट्रेचिंग रोज करणं एकूण शरीरासह किडनीचंही आरोग्य ठणठणीत ठेवतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago