मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक आणि असंसदीय भाषेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना खासदार पाटील यांनी “माझे काय करायचे ते करा, समोर पोलीस आहेत, कमिशनरकडे तक्रार करा” अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचा आरोप संघाने केला आहे. लोकप्रतिनिधींना अशा प्रकारची दमदाटीची भाषा शोभणारी नसून पत्रकार म्हणून आपले कर्तव्य बजावणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा हा अपमान असल्याचे संघाने म्हटले आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांशी अशा पद्धतीने वागणे म्हणजे केवळ पत्रकारांचाच नव्हे तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचाही अवमान आहे. लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नांना संयमाने आणि जबाबदारीने उत्तरे देणे अपेक्षित असते. पत्रकारांना धमकावण्याचा किंवा त्यांची अवहेलना करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.
अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत समाजात चुकीचा संदेश जात असल्याची चिंता व्यक्त करत मुंबई मराठी पत्रकार संघाने खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…
मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…
मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…
मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…
मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…