मुंबई: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व वास्तुविशारद अनंत गाडगीळ यांनी या प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी (ऑडिट) करण्याची मागणी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात गाडगीळ यांनी म्हटले आहे की, डोंगराळ भागातील बोगद्यांच्या आतील भागाला मजबुती देण्यासाठी जाड काँक्रीटचे लायनिंग केले जाते. हे लायनिंग निकृष्ट दर्जाचे किंवा चुकीच्या पद्धतीने झाले असल्यास पावसाळ्यात डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्याच्या दाबामुळे ते निकामी ठरू शकते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांवरून ही बाब स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला.
युरोपियन मानकांनुसार अशा बोगद्यांची १० ते १२ महिने चाचणी करून उणिवा दूर केल्यानंतरच ते वाहतुकीसाठी खुले केले जातात. मात्र, राज्य सरकारने घाईघाईत उद्घाटन केल्याने बांधकामाच्या सुरक्षिततेची आवश्यक तपासणी झाली नसल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला.
मुंबई-पुणे मार्गावर नियमित प्रवास करणारे अनेक टॅक्सीचालक ‘मिसिंग लिंक’चा वापर करण्यास घाबरत असल्याचा दावा करत, संपूर्ण ९ ते १० किलोमीटरच्या मार्गात नैसर्गिक वायुवीजनासाठी अधिक ओपनिंग असलेला पर्याय निवडणे आवश्यक होते, असेही गाडगीळ म्हणाले.
या प्रकल्पासाठी अवघ्या ९ ते १० किलोमीटर अंतरासाठी सुमारे १२ ते १३ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या खर्चाचा सविस्तर तपशील राज्य सरकारने जाहीर करावा. जनतेच्या पैशाची लूट झाली आहे का, याचे सत्य समोर यावे म्हणून स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मिसिंग लिंकमधून पहिल्याच प्रवासानंतर हा मार्ग धोकादायक वाटत असल्याची भीती आपण मंत्रालयातील पत्रकारांशी व्यक्त केली होती, असा दावा करत गाडगीळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि “विकासाचे गुजरात मॉडेल नको,” असा टोला लगावला.
मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरातील अतिसुरक्षित राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका…
मुंबई: एका बाजूला महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या दालनात मंत्रिपदांच्या खुर्च्यांचा…
मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत…
मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर…
मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याच्या…