महाराष्ट्र

मालवणी शौचालय सेप्टीक टँक दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना ₹ ९० लाखांची मदत

मुंबई: मागील वर्षी मालवणी, अंबोजवाडी येथील मनपा शौचालयाच्या सेप्टीक टँक मध्ये पडून खाजगी कामगार असलेल्या रामलगन केवट व त्यांचे दोन मुलगे विकास केवट, सुरज केवट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार अस्लम शेख यांनी राज्यसरकार व महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेकडून आधी ₹ ३० लाख व शुक्रवारी ₹ ६० लाख असे एकूण ९० लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले.

गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेत रामलगन केवट यांच्या पत्नी इंद्रावती केवट यांनी आपले पती व दोन मुलगे गमावले. कुटुंबाचा आधारच गेल्याने लहान मुलाचा, मुलीच्या भवितव्याचे काय हा प्रश्न इंद्रावती यांच्या समोर उभा राहिला होता. इंद्रावती यांचे सासरे देखील वयोवृद्ध व आजारपणाने बेजार झालेले असल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील उभा राहिला.

स्थानिक आमदार या नात्याने आमदार अस्लम शेख यांनी केवट कुटुंबीयांना काही मदत मिळावी यासाठी राज्यसरकार व पालिकेशी सातत्यपुर्ण पाठपुरावा चालू केला. त्यांच्या ह्या पाठपुराव्याला यश मिळालं आणि मृत रामलगन केवट यांच्या पत्नी इंद्रावती यांना ₹ ३० लाखांचे सहाय्य करण्यात आले. मात्र ही मदत पुरेशी नव्हती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्या नंतर पालिकेकडून आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते आज ₹ ६० लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना शेख म्हणाले, केवट कुटुंबीयांनी जे गमावल त्याची भरपाई होऊ शकत नाही. मात्र ह्या रकमेमुळे केवट यांच्या पत्नी इंद्रावती व त्यांचा मुलगा व मुलगी यांचे भविष्य सुरक्षित होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

10 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

16 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

16 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

17 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

17 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

17 तास ago