औरंगाबाद: जमिनीची खरेदी विक्री करणे, तसे कठीणच काम. मात्र ज्यांना ही गोष्ट सवयीची असते त्यांच्यासाठी ते सहज सोपं असतं. अशात जमिनी संबंधित 5 गोष्टी प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक आहे. या 5 गोष्टी जर जमिनी खरेदी विक्री करताना तपासल्या नाही, तर भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
जमिनीची चतुर्सिमा
जमिनीची चतुर सीमा म्हणजे हद्द आहे. शेजाऱ्याने बांध करण्याचे आणि बांध सरकवण्याचे प्रकार आपण ऐकले असतील. जमिनीची हद्द सारखं क्षेत्र पूर्ण भरते की नाही याच्या बाबतीमध्ये तुम्ही माहिती घेतली पाहिजे आणि त्याची माहिती घेणे काहीही चुकीचं नाही, यासाठी तुम्ही जमीन व्यवस्थित मोजून चतुर सीमा प्रमाण आहे की नाही, ते तपासणे आवश्यक आहे.
जमिनीवरील बोजा व न्यायप्रविष्ठ खटला
जमिनीवर कुठल्या बँकेचे कर्ज आहे की नाही, हे तपासमे फार महत्त्वाचे आहे. कारण जमीन कुठे गहाण वगैरे ठेवून जर त्यावर पैसा वगैरे उचललेला असेल आणि तुम्हाला डुब्लिकेट सातबारा दाखवून जमिनीची खरेदी विक्री होत असेल, तर फसवणूक होऊ शकते. यासाठी डिजिटल सातबारा काढून क्रॉस चेक करता येऊ शकते.
सातबारावर असणारी नावे
सातबारा वर असणारी व्यक्तींची एकूण नावे तपासणे देखील आवश्यक आहे. जो व्यक्ती जमीन विकत आहे त्याच्याच नावावर सातबारा आहे का किंवा इतर काही वारसदार त्याला लावले आहेत का? तसेच काही कुळ त्यावर लावलेले आहे का, ती व्यक्ती हयात आहेत का आणि हयात असताना त्यांच्यासाठी काही हरकत तर नाही ना, यासंदर्भातील गोष्टींचा विचार तुम्ही करणे आवश्यक आहे.
जमीन आरक्षित तर नाही ना?
काही जमिनींना हिरवा पट्टा किंवा पिवळा पट्टा इत्यादी गोष्टी आरक्षित करते. जर जमीन या आरक्षित प्रकारातील आहे. तर याची चौकशी करणे फार गरजेचे आहे. कारण की ही जमीन गव्हर्मेंट च्या ताब्यातही असू शकते म्हणजेच शासन काही जमिनींना हिवाळा पट्टा किंवा पिवळा पट्टा लावलेला असतो.
जमिनीत येण्या-जाण्यासाठी रस्ता
ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. याबाबच नेहमीच वाद होतात. त्यामुळे प्लॉट किंवा जमीन खरेदी करताना त्यामध्ये किती फुटाचा रस्ता आहे, शासन नियमानुसार त्याचा नकाशा बघून तो रस्ता दाखवलेला असताना तो रस्ता योग्य प्रमाणे आहे का? शेतीमध्ये बैलगाडी जाते का, रस्ता पुढे भविष्यात बंद होईल की नाही या संदर्भातील सर्व माहिती घेणे गरजेचे असते
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…