महाराष्ट्र

मोदींच्या कारभारामुळे देशात सत्ताबदल होणार; २०२९ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : आगामी काळात देशात सत्ताबदल होणार असून, हा बदल काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षामुळे नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांतील कारभारामुळे होईल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२०२९ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये नेतृत्वबदलाची तयारी सुरू झाली असून, अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे, असाही दावा चव्हाण यांनी केला.

पूर्णवेळ शिक्षणमंत्र्याची गरज

मोदी सरकारच्या उर्वरित कार्यकाळात देशाला पूर्णवेळ शिक्षणमंत्री मिळणे आवश्यक असल्याचे चव्हाण म्हणाले. सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्याकडे आधीच तीन महत्त्वाची खाती असल्याने शिक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्यासाठी पूर्णवेळ मंत्री असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणारा, परीक्षाव्यवस्थेतील गोंधळ कमी करणारा आणि मूलभूत शिक्षणाच्या समस्या जाणणारा शिक्षणमंत्री देशाला हवा. मात्र, सध्याच्या मोदी सरकारमध्ये अशी व्यक्ती दिसत नाही, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. लवकरच मोदी देशाला चांगला शिक्षणमंत्री देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

फडणवीसांना शिक्षणमंत्रिपद दिल्यास विरोध

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळण्याच्या चर्चांवरही चव्हाण यांनी भाष्य केले. फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रिपद दिल्यास त्याला काँग्रेसचा विरोध असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी झाल्याचा आरोप करत फडणवीस शिक्षणमंत्रिपदासाठी योग्य व्यक्ती नसल्याचे चव्हाण म्हणाले.

समृद्धी महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर टीका

नाशिकमधील पायाभूत सुविधांवरही चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले. समृद्धी महामार्गाने नाशिकला येताना योग्य दिशादर्शक फलक नसल्यामुळे आपला रस्ता चुकल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकसारख्या आधुनिक शहरात अशा मूलभूत सुविधांची कमतरता असणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

नाशिकमध्ये येताना रस्त्यांवरील खड्ड्यांचाही अनुभव आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. सहा कोटी लोक नाशिकमध्ये आले तर शहर हा भार पेलू शकेल का, याचा विचार झाला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या नावाखाली केवळ पैसे खाण्याचा विषय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

3 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

6 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

6 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

7 तास ago