महाराष्ट्र

रामनवमीत नवी मुंबईत रंगणार ‘लोककला दर्शन’चा भव्य सोहळा

नवी मुंबई: रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांसाठी यंदा खास सांस्कृतिक मेजवानीची पर्वणी ठरणार आहे. सेक्टर १९, भूमिकोलोसा चौक, ऐरोली येथे श्रीराम संकल्प प्रतिष्ठानतर्फे २६ मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबई विश्व लोककला मंच सादर करीत असलेला ‘लोककला दर्शन’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सांगीतिक कलाविष्कार. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना राज्यातील विविध लोककला, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे.

विशेष म्हणजे, या कलाविष्कारातून प्रभू श्रीराम यांच्या पराक्रमाची कथा सादर केली जाणार असून, त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक अशा दुहेरी आनंदाचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा कार्यक्रम नवी मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

सध्या महाराष्ट्रात लोककलांना नवसंजीवनी मिळत असून विविध ठिकाणी भव्य स्वरूपात सादरीकरण होत आहे. अशा पार्श्वभूमीवर भजन किंवा नाटकांपेक्षा वेगळा आणि समृद्ध लोकसंस्कृतीचा अनुभव देणारा हा उपक्रम ऐरोलीतील नागरिकांसाठी अनोखा ठरणार आहे. त्यामुळे सर्व रामभक्त आणि रसिक प्रेक्षकांनी या भव्य ‘लोककला दर्शन’ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि प्रभू श्रीराम यांच्या चरित्राचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

13 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

17 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

17 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

17 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

17 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

18 तास ago