महाराष्ट्र

दुबईत अडकलेल्या मराठी नागरिकांसाठी मदतीचा हात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

मुंबई: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आखाती देशांवरही जाणवत असून, अनेक मराठी नागरिक सध्या दुबईत अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना दिलासा दिला आहे.

ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर आदी भागांतील नागरिकांनी मदतीसाठी शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे तब्बल ८४ विद्यार्थी सध्या दुबईत अडकले असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

दुबईतील बृहनमहाराष्ट्र मंडळ यांच्या सहकार्याने शिंदे यांनी डॉ. संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धीर देत, “या कठीण प्रसंगी महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन दिले.

याशिवाय दुबईत अडकलेल्या इतर मराठी नागरिकांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “कोणतीही चिंता करू नका. जिथे आहात तिथे तुम्हाला आवश्यक ती मदत मिळावी यासाठी बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी समन्वय सुरू असल्याची माहिती देत शिंदे यांनी सर्वांना संयम राखण्याचे आवाहन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

18 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago