महाराष्ट्र

अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड

महाराष्ट्राची भाषा ही मराठीच; मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल असा निर्णय महायुती सरकार कधीही घेणार नाही…

मुंबई: अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

आषाढी वारीला ८०० वर्षाची परंपरा आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक ओळख आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीवरुन पालखी निघते.संत तुकारामांच्या देहू येथूनही पालखी निघते. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्यावेळी मुस्लिम समाजाचे अनेक बांधव त्या वारीत सहभागी होतात आणि वारकर्‍यांना सेवा देतात याची आठवणही आनंद परांजपे यांनी अबु आझमी यांना करून दिली आहे.

कायम हिंदू – मुस्लिम राजकारण करुन अबु आझमी प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सरकारने करावी असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राची भाषा ही मराठीच;मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल असा निर्णय महायुती सरकार कधीही घेणार नाही…

महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. त्यामुळे मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल अशाप्रकारचा निर्णय महायुतीचे सरकार कधीही घेणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केंद्राकडून आलेली आहे याबाबतची एक बैठक ठेवली आहे. तो जीआर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून निघाला यामध्ये पहिली ते पाचवी महाराष्ट्रातील सर्व शाळांना मराठी हे अनिवार्य आहे. आणि तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा भारतातील कुठलीही भाषा घेऊ शकतो. २० विद्यार्थी जी भाषा घेतील त्यासाठी लागणारा शिक्षक घेणे ही त्या शाळेची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे मराठी ही भाषा महाराष्ट्राची आहे. अभिजात भाषेचा दर्जा हा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे हेदेखील विसरता कामा नये. राज्यसरकार मराठी भाषेविषयी संवेदनशील आहे असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

औरंग्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात कुठेही स्थान नाही; औरंगजेबाचे उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही…

छत्रपती संभाजी महाराजांना पकडून क्रूर पध्दतीने हालहाल करुन हत्या केली हा इतिहास महाराष्ट्र कधी विसरु शकणार नाही. त्यामुळे अशा औरंग्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात कुठेही स्थान नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

औरंगजेब हा क्रूर राज्यकर्ता होता. ज्याने आपल्या स्वतःच्या वडीलांना आठ वर्षे कैदेत ठेवले. राजगादीवर बसण्यासाठी आपल्या सख्ख्या भावांना ठार मारले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक आक्रमणे केली याची आठवण उदात्तीकरण करणार्‍या लोकांना आनंद परांजपे यांनी करुन दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

18 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

18 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

18 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

19 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

19 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

22 तास ago