मुंबई: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव पोलीस ठाण्यात श्रेयससह अन्य १२ जणांविरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मैनपुरी जिल्ह्यातील मोहल्ला मिश्राना येथील एका रहिवाशाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, श्रेयस तळपदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका मुंबईस्थित नामांकित बँकेच्या शाखेच्या नावाखाली गुंतवणुकीची योजना राबवली. कमी कालावधीत जास्त परताव्याचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील नागरिकांकडून लाखो रुपये गोळा करण्यात आले. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे परत न देता टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने प्राथमिक सुनावणीनंतर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
नेमके आरोप काय?
नामांकित बँकेच्या नावाचा वापर करून विश्वासार्हता निर्माण केल्याचा आरोप
कमी वेळेत जास्त नफा देण्याचे आश्वासन
ग्रामीण गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उभारणी
परताव्याच्या वेळी पैसे न देणे किंवा संपर्क टाळणे
श्रेयस तळपदे यांच्यावर यापूर्वीही उत्तर प्रदेशातील बागपत, लखनऊ तसेच हरियाणातील सोनीपत येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. ‘लोणी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी’शी ब्रँड अँबेसेडर म्हणून संबंधित असल्याने त्यांचे नाव या प्रकरणांत पुढे आले आहे.
श्रेयस तळपदेची भूमिका
पूर्वीच्या प्रकरणांत श्रेयस तळपदे यांनी स्पष्ट केले होते की, ते संबंधित संस्थांच्या कार्यक्रमांना केवळ ‘गेस्ट सेलिब्रिटी’ किंवा ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणून उपस्थित राहिले होते. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांशी किंवा व्यवस्थापनाशी त्यांचा थेट संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षणही मिळाले आहे.
कामाच्या आघाडीवर व्यस्त
कायदेशीर वाद सुरू असतानाही श्रेयस तळपदे कामाच्या आघाडीवर सक्रिय आहेत. नुकतेच ते ‘आझाद भारत’ चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत झळकले होते. तसेच २०२६ मध्ये त्यांचे ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘द गेम ऑफ गिरगिट’ हे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.दरम्यान, या नव्या प्रकरणात पुढील तपासानंतर अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…