महाराष्ट्र

अजित पवारांच्या मृत्यूचा तपास थातूरमातूर नको, अन्यथा…

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या तपासावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार Rohit Pawar यांनी या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत सखोल आणि पारदर्शक चौकशीची जोरदार मागणी केली आहे.

“चौकशी नावापुरती नको”

“अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी केवळ नावापुरती नको, तर ती सखोल आणि पारदर्शक व्हायला हवी. जर यंत्रणांनी वेळकाढूपणा केला किंवा चुकीच्या दिशेने तपास नेला, तर मराठी माणूस काय आहे हे दाखवून द्यावे लागेल,” असा इशारा रोहित पवार यांनी सरकार आणि तपास यंत्रणांना दिला.

तपासाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

अपघातासंदर्भातील तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवताना रोहित पवार म्हणाले, “दोन रिपोर्ट आले असले तरी सर्वात महत्त्वाचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. ऐनवेळी वैमानिक बदलण्याचे कारण काय? क्राईम इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट (CID) आतापर्यंत काय करत होती? तपास सेंट्रल बुरेवू ऑफ इन्वेस्टीगेशन (CBI) कडे गेला असला तरी त्यांना दोन-तीन महिने लागू शकतात. मात्र, या काळात तपासाची दिशा भरकटू नये,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे यांसारख्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण स्वतः या मागणीचा पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी एकसंध राहणार

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, आगामी अधिवेशनासह पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्ष आणि महाविकास आघाडी एकसंध राहील. युतीची वज्रमूठ कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवर संकेत

राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत बोलताना त्यांनी मोठे विधान केले. “खुद्द अजित पवार यांचीही इच्छा होती की शरद पवार यांनी राज्यसभेत जावे. जर शरद पवार स्वतः इच्छुक असतील, तर महाविकास आघाडीचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल,” असे ते म्हणाले. अद्याप आघाडीची अधिकृत बैठक झालेली नसली तरी इतर पक्षांची भूमिका लवकरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि तपासातील संशयास्पद मुद्द्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे तपास यंत्रणांवर आता अधिक दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

6 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

6 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

21 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago