महाराष्ट्र

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबादास दानवेंनी मांडली सभागृहात आक्रमक भूमिका

मुंबई: राज्यातील कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविले गेले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत २८९ अनव्ये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली.

बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक दिल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. पाकिस्तान, कझाकिस्तान,तुर्कीस्तान, नेदरलँड आदी देशांत व आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची कमतरता मोठया प्रमाणात आहे. मात्र राज्यातील कांदा उत्पादक हमीभाव न मिळाल्यामुळे शेतावर नांगर फिरवत आहे. त्यामुळे कांदा निर्यात करण्यासाठी सरकारने पावले उचलावी व नाफेड मार्फत कांदा खरेदी करावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

अमरावतीत सोमवारी शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज प्रकरण ही दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणला. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दानवे यांनी करत शेतकरी गुन्हेगार, दहशतवादी आहेत का? त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय असा सवाल उपस्थित केला.

ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून सरकार राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. १२ ते १४ हजार कापसाला भाव मिळत होता, मात्र आता ७ ते ७.५ हजार इतका भाव खाली आला आहे. कापसाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला, मात्र आता त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कांद्याची स्थिती योग्य असल्याचे मान्य केले. नाफेडमार्फत कोणत्याही अटी व शर्तीशिवाय कांदा खरेदी केला जाईल व याबाबत केंद्र सरकारकडे चर्चा केली जाईल, असे त्यांनी म्हटले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

14 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago