छ. संभाजीनगरसह ‘या’ १५ जिल्ह्यात ३१ हजार कोटींची थकबाकी
संभाजीनगर: महाराष्ट्रातील तब्बल २० लाख ३७ हजार २१० शेतकरी सध्या बॅंकांचे ३१ हजार २५४ कोटी रुपयांचे कर्ज थकवून आहेत. यामुळे या शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे सध्या बंद झाले आहेत. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
का वाढली थकबाकी
कर्जमाफीची आशा: सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे अनेक शेतकरी थकबाकी भरत नाहीत.
नैसर्गिक आपत्त्या: मॉन्सूनपूर्व पाऊस, अतिवृष्टी, महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी कर्ज फेडू शकत नाहीत.
हमीभाव आणि एफआरपी: पिकांना योग्य हमीभाव न मिळणे आणि उसाची एकरकमी एफआरपी (FRP) न मिळणे ही देखील प्रमुख कारणे आहेत.
CIBIL स्कोअरची अडचण: बॅंकांकडून सिबिल (CIBIL) स्कोअर तपासला जात असल्याने, थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत, जरी याबाबत आदेश नसले तरी.
‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकी
छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी आहे. यात प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे:
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
बीड
बुलढाणा
जालना
कोल्हापूर
मुंबई
नागपूर
नांदेड
नाशिक (२७९० कोटी)
धाराशिव
परभणी
पुणे
सोलापूर (२६८१ कोटी)
यवतमाळ (२२५६ कोटी)
विशेषतः बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दीड लाख ते सव्वा दोन लाख शेतकरी थकबाकीत आहेत.
थकबाकीदार शेतकऱ्यांची सद्यस्थिती
एकूण शेतकरी: १,२९,३२,४८७
थकबाकीदार शेतकरी: २०,३७,२१०
एकूण थकीत रक्कम: ३१,२५३.५९ कोटी रुपये
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…