महाराष्ट्र

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार…

औरंगाबाद: राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सध्या मुंबईत सुरू होता. याच कार्यक्रमात कुठे तरी थांबायचं विचार केला पाहिजे, असे म्हणत शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे झाला असून यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला . १ मे १९६० रोजी माझी सार्वजनिक ६३ वर्षे पूर्ण झाली. त्यातील ५८ वर्षे मी राजकारणात राहिलो यानंतर आता केवळ तीन वर्षे राहिली आहेत. असे म्हणत त्यांनी अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या घोषणेनंतर सभागृहात चांगलेच गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. यावेळी हा निर्णय मागे घ्यावा अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

8 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

8 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

14 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

15 तास ago