महाराष्ट्र

वोटचोरी करून भाजप सत्तेत; लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून विजय मिळवला, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक पार पडली. बैठकीला माजी मुख्यमंत्री Sushilkumar Shinde, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar, Balasaheb Thorat, Naseem Khan, Satej Patil यांच्यासह अनेक प्रमुख नेते, खासदार, आमदार आणि BLA-1 पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मतदार यादीतील कथित गैरप्रकार, वोटचोरी आणि SIR मोहिमेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बूथस्तरावर संघटन मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यभर जनजागृती मोहीम राबवून मतदारांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी काँग्रेस आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीला केरळ विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाबद्दल Mallikarjun Kharge यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच केरळचे प्रभारी Ramesh Chennithala यांनी गृहमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.

पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, SIR मोहिमेसंदर्भात BLA-1 कार्यकर्त्यांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली असून राज्यभर बूथस्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मतदार यादी पडताळणी, हरकती आणि दुरुस्त्यांबाबत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक मतदाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले.

SIR मोहिमेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णयही काँग्रेसने घेतला असून Satej Patil यांची समिती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत सपकाळ हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यातील पेट्रोल-डिझेल टंचाईच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ते गझनी झाले आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे कोणतेही लक्ष नाही.”

आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजपवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप केला. “जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मराठा, ओबीसी, धनगर आणि इतर समाजघटकांना भाजप महायुती फसवत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, Vijay Wadettiwar यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचार आणि शेतकरी प्रश्नावरून जोरदार हल्ला चढवला. “या सरकारमध्ये शंभरहून अधिक घोटाळे झाले आहेत. निष्पक्ष चौकशी झाली तर सरकारमधील अनेकजण गजाआड जातील,” असा दावा त्यांनी केला. तसेच राज्य सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असल्याचेही ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजभवनात तैनात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरातील अतिसुरक्षित राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका…

13 मिनिटे ago

खुर्च्यांचा खेळ आणि सत्तेचा ताप

मुंबई: एका बाजूला महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या दालनात मंत्रिपदांच्या खुर्च्यांचा…

18 मिनिटे ago

RTO घोटाळ्यावर विधानसभेत खळबळ; विजय वडेट्टीवारांचे रॅकेटचे आरोप, SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत…

21 मिनिटे ago

राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहारावर काँग्रेसचा हल्लाबोल; चंपत राय, अनिल मिश्रांवर कारवाईची मागणी

मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल…

26 मिनिटे ago

करडे-कारेगाव रस्त्यावर मंगल कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग, श्रीमंतांच्या लग्नाचा थाट, सामान्य वाहनचालकांना शिक्षा…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर…

30 मिनिटे ago

अतिवृष्टीमुळे अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीला ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याच्या…

33 मिनिटे ago