महायुतीत अंतर्गत तणाव उघड; स्थानिक राजकारणामुळे भाजप सत्तेबाहेर
मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीने अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली असली तरी काही पंचायत समित्यांमध्ये मित्रपक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजपला धक्के बसले आहेत. गेल्या २४ तासांत तीन पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत महायुतीतीलच पक्षांनी वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये शिंदे गटाने काँग्रेसला पाठिंबा दिला, तर हवेलीत राष्ट्रवादीने अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली.
जुन्नर पंचायत समितीत दोन्ही शिवसेना एकत्र
पुणे जिल्ह्यातील जुन्नर पंचायत समितीत १६ सदस्यांपैकी शिंदे गट शिवसेनेचे ८, अजित पवार गट राष्ट्रवादीचे ६, भाजपचा १ आणि उद्धव ठाकरे गट शिवसेनेचा १ सदस्य निवडून आला होता. सत्ता स्थापनेसाठी ९ सदस्यांची गरज होती.
शिंदे गटाला भाजप किंवा ठाकरे गटाचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र स्थानिक समीकरणे आणि भाजपच्या वरचष्मामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाशी हातमिळवणी केली.
यामध्ये शिंदे गटाच्या कमल शेळकंदे यांची सभापतीपदी, तर ठाकरे गटाचे अमित ढोले यांची उपसभापतीपदी निवड झाली. ठाकरे गटाच्या एकमेव सदस्याने पक्षाच्या आदेशाला डावलून शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने हा निकाल लागला. परिणामी भाजप सत्तेबाहेर राहिला.
मिरजमध्ये शिंदे गटाची काँग्रेसला साथ
सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीत २२ सदस्यांपैकी भाजपने सर्वाधिक १० जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी (अजित पवार गट) ४, काँग्रेस ३, अजित गट ३ आणि शिंदे गट शिवसेनेला २ जागा मिळाल्या.
भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता असतानाच शेवटच्या क्षणी शिंदे गटाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.यामुळे काँग्रेसच्या अवघ्या २१ वर्षांच्या तन्वी सुनील कमलेकर यांची सभापतीपदी, तर शिंदे गटाच्या ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी निवड झाली. भाजपचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली असली तरी मित्रपक्षाच्या भूमिकेमुळे सत्ता हुकली.
हवेलीमध्ये राष्ट्रवादी-अपक्षची सत्ता
पुणे जिल्ह्यातील हवेली पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी ७ सदस्यांची आवश्यकता होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागा, भाजपने ४, तर शिंदे गट शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी १ जागा जिंकली.
राष्ट्रवादीला बहुमतासाठी एका मताची गरज होती. अपक्ष सदस्या विद्या गायकवाड यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने युवराज हिरामण काकडे यांची सभापतीपदी आणि विद्या गायकवाड यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
या तीन घटनांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्टपणे समोर आला आहे. स्थानिक नेते आणि राजकीय समीकरणांमुळे मित्रपक्षांनी भाजपला बाजूला ठेवत सत्ता समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील स्थानिक राजकारणात नवी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…