महाराष्ट्र

पुणे महापालिकेत भाजपचे वर्चस्व कायम! वसंत मोरे यांच्या पराभवानंतरच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. १६५ प्रभाग रचना असलेल्या पुणे महापालिकेत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयात केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या निवडणुकीत इतर पक्षांची अवस्था बिकट झाल्याचे चित्र असून, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, पुण्यातील राजकारणात नेहमी चर्चेत असणारे ठाकरे गटाचे आक्रमक नेते वसंत मोरे यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. पुणे महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या निकालाने कात्रज परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, भाजपचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरे यांचा सुमारे ११०० मतांनी पराभव केला आहे.

पराभवानंतरची पोस्ट ठरली चर्चेचा विषय

पराभवानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.“कात्रजच्या जनतेने त्यांना जमिनीवर आणलं” असे म्हणत, “परिणाम तर भोगावे लागतील ना…” असे सूचक वक्तव्य त्यांनी पोस्टमध्ये केले आहे. या पोस्टमधून मोरे यांनी नेमका कुणाला इशारा दिला आहे, याबाबत विविध चर्चा रंगत आहेत.

नेमकं काय म्हणाले वसंत मोरे?

वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,“चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो. आणि आता तर २० हजार ८६७ पीडित, शोषित, प्रामाणिक जनतेने आशीर्वाद दिला आहे. परिणाम तर भोगावे लागतील ना…”

मुलगा रुपेश मोरे यालाही पराभव

या निवडणुकीत वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे देखील रिंगणात होता. मात्र, प्रभाग क्रमांक ४० (ड) मधून भाजपच्या उमेदवार रंजना कुंडलिक टिळेकर यांनी रुपेश मोरे यांचा पराभव केला. ही लढत टफ मानली जात होती, मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रुपेश मोरे पिछाडीवर पडल्याने अखेर रंजना टिळेकर विजयी ठरल्या.

पुणे महापालिकेच्या निकालानंतर भाजपचा विजय जितका चर्चेत आहे, तितकीच वसंत मोरे यांच्या पराभवानंतरच्या भूमिकेची आणि सूचक पोस्टचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago