मुंबई: नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील युवकांना क्रीडा क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात विविध अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यासाठी टप्पा-२ अंतर्गत ८०.१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ही माहिती दिली.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून क्रीडा पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. येथील तरुणांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
यापूर्वी २३ कोटींचा निधी
गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलासाठी यापूर्वीच २३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून जलतरण तलाव, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल मैदाने, बास्केटबॉल सिमेंट कोर्ट, बॅडमिंटन हॉल तसेच क्रीडा वसतिगृहाची कामे पूर्ण झाली आहेत. ही सुविधा नागरिक आणि खेळाडूंसाठी खुली करण्यात आली आहे.
नवीन जागेवर व्यायामशाळेसह प्रशासकीय इमारत आणि चार कोर्टचा इनडोअर बॅडमिंटन हॉल पूर्ण झाला आहे. तसेच डोम प्रकारच्या मल्टीगेम हॉलचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
१७ जूनला उच्चाधिकार समितीची मंजुरी
टप्पा-२ मधील कामांसाठी ८०.१२ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव क्रीडा संचालनालयाने सादर केला होता. या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने १७ जून २०२६ रोजी मंजुरी दिली होती. आता मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीमुळे या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे गडचिरोलीतील युवा खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होणार असून, दुर्गम भागातील क्रीडा प्रतिभेला मोठी संधी मिळणार आहे. गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्रात या सुविधांमुळे नवी क्रांती घडेल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने…
मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे.…
मुंबई: २२व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक…
मुंबई: पुणे येथे २०३२ मध्ये ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास महाराष्ट्र…
मुंबई : दादर रेल्वे स्थानक परिसरात लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या सलग घटनांनी रेल्वे…
मुंबई: लावणी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली कला. तिच्या ठेक्यात महाराष्ट्राचा इतिहास आहे, शब्दांत लोकजीवन आहे…