मुंबई: माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना जाहीर झाला आहे.
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठी बाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून सर्व महानगरपालिका स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
“महाराष्ट्राची राजभाषा मराठी” या विषयाच्या अनुषंगाने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठीबाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून अभिनव कल्पनेच्या आधारे जसे की, अभिनव कल्पनेत संगीत, छायाचित्रीकरण, रेखाचित्रे, घोषवाक्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विषय मांडणी इत्यादी विविध माध्यमांचा उपयोग करुन महानगरपालिका क्षेत्रातील अधिकारी – कर्मचारी यांनी वरील माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना शिक्षीत करावयाचे अपेक्षित होते. स्पर्धेत महानगरपालिकेच्या कमीत कमी १० अधिकारी/कर्मचारी यांनी भाग घेणे आवश्यक होते. २७ महानगरपालिकापैकी ८ महानगरपालिकेचे प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त झाले होते.
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…