महाराष्ट्र

दिव्यांग-ज्येष्ठांसाठी केंद्राची विशेष मोहीम; १०० हून अधिक जिल्ह्यांत महाशिबिरांतून मोफत सहायक उपकरणांचे वाटप

नवी दिल्ली : देशातील दिव्यांग व्यक्ती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने विशेष मोहीम सुरू केली आहे. देशभरातील १०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये ‘महाशिबिरां’चे आयोजन करण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांना विविध प्रकारची सहायक उपकरणे आणि साधने मोफत दिली जात आहेत.

‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ आणि ‘एडीआयपी’ (ADIP) या केंद्रीय योजनांच्या माध्यमातून ही शिबिरे राबविली जात आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करून त्यांना अधिक सक्षम करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

आधुनिक उपकरणांसह मोफत साहित्य

महाशिबिरांमध्ये पारंपरिक साधनांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या उपकरणांचेही वाटप केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल श्रवणयंत्रे, व्हीलचेअर, चालण्यासाठी स्टिक, चष्मे तसेच कृत्रिम दात यांसारखी साधने उपलब्ध करून दिली जात आहेत.

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या मोटराइज्ड ट्रायसायकल, डिजिटल स्मार्ट केन, विशेष कुबड्या, लॅपटॉप आणि कृत्रिम अवयव यांसारखी उपकरणे दिली जात आहेत.

कोणती उपकरणे मिळणार?

ज्येष्ठ नागरिकांसाठी : डिजिटल श्रवणयंत्रे, चालण्यासाठी स्टिक, फोल्डिंग व्हीलचेअर, चष्मे आदी.

दिव्यांग व्यक्तींसाठी : मोटराइज्ड ट्रायसायकल, स्मार्ट अंध काठी, विशेष लॅपटॉप, कृत्रिम अवयव आदी.

इतर पात्र लाभार्थ्यांसाठी : मोफत वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यक उपकरणांचे जागेवर फिटिंग करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.

लाभासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक 

शिबिराचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडे आधार कार्ड, नियमानुसार उत्पन्नाचा दाखला, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र किंवा युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत. ADIP योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्वाची अट लागू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल नोंदणीमुळे पारदर्शकता

लाभार्थ्यांपर्यंत मदत पारदर्शक पद्धतीने पोहोचावी यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. लाभार्थ्यांची नोंदणी तसेच उपकरणांच्या वितरणाची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने ट्रॅक केली जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालये आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या समन्वयातून ही महाशिबिरे आयोजित केली जात असून, गरजू दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्यावर मोहिमेत भर देण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

3 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

4 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

7 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

7 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

8 तास ago