महाराष्ट्र

शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; e-KYC साठी २० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ

पुणे : राज्यभरातील खाजगी शाळांमधील अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे e-KYC पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

यापूर्वी ऑगस्ट २०२६ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, विभागीय आणि क्षेत्रीय स्तरावरील आढाव्यात अद्याप काही कर्मचाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी शिक्षण विभागाने अंतिम मुदतवाढ दिली आहे.

२० सप्टेंबरनंतर मुदतवाढ नाही

शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी तसेच शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. २० सप्टेंबर २०२६ पर्यंत e-KYC पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२६ चे वेतन, जे नोव्हेंबरमध्ये अदा केले जाते, देण्यात येणार नाही. तसेच यापुढे e-KYC साठी कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शाळांना तातडीने सूचना देण्याचे निर्देश

या निर्णयाची गंभीर दखल घेत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, मुंबईचे शिक्षण निरीक्षक तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

MahaIT ला तांत्रिक सुविधांच्या सूचना

शालार्थ प्रणालीची तांत्रिक जबाबदारी असलेल्या MahaIT ला देखील आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. e-KYC पूर्ण करण्यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे २० सप्टेंबरपर्यंत e-KYC पूर्ण होणार नाही, अशा कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन बिल प्रणालीमध्ये तयार होणार नाही, अशी Validation व्यवस्था करण्याच्या सूचनाही MahaIT ला देण्यात आल्या आहेत.त्यामुळे संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी शालार्थ प्रणालीतील e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

4 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

4 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

8 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

8 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

8 तास ago