महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जा विभागावर RTI टाळाटाळीचा आरोप; माहिती लपवण्यामागे नेमके कोण?

सौर कृषी पंप योजनेतील माहिती मागवूनही उत्तर न मिळाल्याचा पत्रकार विवेक भावसार यांचा दावा; प्रशासनाच्या पारदर्शकतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न.

मुंबई : राज्य सरकार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गंभीर आरोप समोर आले आहेत. TheNews21 आणि राजकारण (The Rajkaran) या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक-संपादक विवेक भावसार यांनी लिहिलेल्या संपादकीयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील ऊर्जा विभाग, महावितरण आणि संबंधित महामंडळांवर माहितीच्या अधिकार (RTI) कायद्यांतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे.

भावसार यांच्या मते, “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजनेतील निविदा प्रक्रिया, कंपन्यांची निवड आणि कंत्राट वाटपाबाबत नोव्हेंबर २०२५ मध्ये RTI अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज अनेक महिने विविध कार्यालयांमध्ये फिरत राहिला. अखेर काही कागदपत्रे मिळाली, पण मागितलेली महत्त्वाची माहिती—निविदापूर्व बैठकीचे इतिवृत्त, सहभागी कंपन्यांची यादी आणि कंत्राट वाटपाचा तपशील—आजतागायत देण्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याशिवाय, पहिल्या अपीलावर अनेक महिने कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे तसेच राज्य माहिती आयोगात दुसरे अपील दाखल केल्यानंतर २०२२ मधील प्रकरणांवरच सुनावणी सुरू असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. इतकेच नव्हे, तर आपण कधीच दाखल न केलेल्या एका RTI अर्जाच्या संदर्भात उत्तर मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी करत, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात प्रशासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी असणे आवश्यक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

48 मिनिटे ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

5 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

5 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

5 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

5 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

5 तास ago