महाराष्ट्र

सदा सरवणकरांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतोय म्हणून क्लीनचीट…

शिंदे – फडणवीस सरकार कायदा धाब्यावर बसवत आहे; महेश तपासे

मुंबई: सदा सरवणकर हे बंदुकीचे परवानाधारक आणि त्यांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतो म्हणून क्लीनचीट मिळणार असेल तर शिंदे – फडणवीस सरकार कायदा कशापद्धतीने धाब्यावर बसवत आहे हे स्पष्ट होत आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मिरवणूकीत गोळीबार केला नाही तर दुसर्‍यानेच त्यांच्या बंदुकीतून गोळीबार केला म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी त्यांना क्लीनचीट दिल्याच्या अजब युक्तीला महेश तपासे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

स्वतःची अधिकृत आणि परवाना असलेली बंदुक ही दुसर्‍याला वापरण्यासाठी देता येते का? असा थेट सवालही महेश तपासे यांनी केला आहे. भारतीय शस्त्र कायदा १९५९ कलम ३ मध्ये परवाना नुतनीकरण असेल किंवा बंदुक दुरुस्ती करावयाची असेल अशावेळी दुसरा व्यक्ती परवानाधारकाचे पत्र घेऊन त्याच्या उपस्थितीतच ती बंदुक स्वतः कडे ठेवू शकतो असे स्पष्ट म्हटले आहे याची आठवणही महेश तपासे यांनी करुन दिली आहे.

दरम्यान स्वतः ची बंदुक सार्वजनिक कार्यक्रमात दुसर्‍याकडे देता येत नाही. दुसऱ्याकडे देऊन त्याने गोळीबार केला असेल तर त्यात आमदार सदा सरवणकर हेही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि दुसरा गोळीबार करणारा कोण हे पोलीसांनी उघड केले पाहिजे, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago