महाराष्ट्र

अदानी महाघोटाळ्यावर पंतप्रधान मोदी व भाजपा गप्प का?

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी जाब विचारत असून १३ तारखेला मुंबईत धडक मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदींच्या हुकूमशाही कारभामुळे देश आर्थिक संकटातून जात आहे, त्यातच जनतेचा पैसा अदानीच्या घशात घालून त्यांनाही आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस नेते मा. खा. राहुलजी गांधी यांनी अदानीचा फुगा लवकर फुटेल अशी भिती व्यक्त केली होती पण मोदी सरकार वेळीच सावध झाले नाही. विरोधी पक्षांचे मोदी ऐकतच नाहीत. अदानीचा फुगा फुटला आणि जनतेचा पैसा धोक्यात आला, हा पैसा बुडेल अशी भिती वाटते.

काँग्रेस पक्षाने संसदेत अदानी महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली पण मोदी सरकारने या घोटाळ्यावर एक शब्दही काढला नाही. मोदी सरकार भ्रष्ट अदानीला पाठीशी घालत आहे. राज्यात दोन दिवसात माजी मंत्री हसन मुश्रीफ व सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाईने केली आहे. मुश्रीफ यांच्यावर तर ईडी तिसऱ्यांदा कारवाई करत आहे.

परंतु याच ईडीला भाजपाचे भ्रष्ट नेते दिसत नाहीत. विरोधी पक्षांच्या मागे ईडी, सीबीआय व आयकर विभागाचा चौकशीचा ससेमीरा लावणारे मोदी सरकार अदानी घोटाळ्याची चौकशी का करत नाही? भाजपा सरकार अदानीच्या महाघोटाळ्यावर गप्प बसले असले तरी जनतेच्या हितासाठी काँग्रेसने आवाज उठवला आहे, त्याचाच एक भाग म्हणून राजभवनवर धडक मोर्चा काढला जाणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि. १३) मार्च रोजी दुपारी ३ वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढला जाणार आहे व राजभवनला घेराव घातला जाईल. या मोर्चात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, यांच्यासहित काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटलचे अध्यक्ष, तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 तास ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

3 तास ago

शिरूर तालुक्यात हजारो शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ प्रशासकीय पातळीवर प्रलंबित

कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती, तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारून शेतकरी हैराण    पाबळ (सुनिल…

3 तास ago

शिरुर अरणगाव येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न; पिक उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाची जनजागृती मोहीम

न्हावरे (अक्षय टेमगिरे): अरणगाव (ता. शिरुर) खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया…

3 तास ago

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस सामूहिकरित्या साजरा…

शिरूर: शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील मान्यवरांचा १ जून रोजी सामूहिकरित्या वाढदिवस लहू थोरात (संचालक खरेदी…

9 तास ago

शिरुरमध्ये पत्रकाराला गलिच्छ भाषेत शिविगाळ करून बातमीचा व्हिडिओ हटविण्याचा प्रयत्न; अँड.विकास कुटे यांच्यावर गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दबाव टाकून डिजिटल पुरावे हटविण्यास भाग…

11 तास ago