मुंबई: स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनी प्रेरणा जागृती करण्याचे काम करावे. राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीकरिता सुकाणू समितीसमवेत स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, प्रत्येक महाविद्यालयाने माजी विद्यार्थी व सामाजिक उत्तादायित्व निधीतून स्वायत्त निर्माण करावी. स्वायत्त महाविद्यालयांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना आणखी 5 महाविद्यालयांना या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार करावे. गुणवत्ता राखण्यासाठी नॅक मूल्यांकन महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयांना नॅकचे मानांकन मिळाले आहे, अशा महाविद्यालयांनी इतर महाविद्यालयांना नॅक मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.
जागतिक स्तरावर भारताचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. विविध क्षेत्रात महत्त्वाच्या प्रमुख पदावर भारतीय वंशाच्या व्यक्ती कार्यरत आहेत. देशाचे नाव जागतिक स्तरावर नंबर एकवर राहण्यासाठी शैक्षणिक धोरणातील बदल महत्त्वाचे आहेत. देशातल्या उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणेचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांनी जबाबदारी घेऊन प्रेरणा जागृत करण्याचे काम करावे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांनी केले. यावेळी पनवले, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आदी स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सादरीकरण केले.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…