महाराष्ट्र

सीएनजीच्या दरात मोठी कपात; पाहा दर…

मुंबई : राज्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी कपात जाहीर केली. तर पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. आजपासून (बुधवार) हे नवे दर लागू झाले आहेत.

सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लवकरच उद्योगांना मिळणारा काही नॅचरल गॅस दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईतील महानगर गॅससारख्या सिटी गॅस ऑपरेटरना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किमती रोखण्यात मदत होणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी आणि पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे.

>> मुंबई- 74 रुपये
>> पुणे- 79 रुपये
>> ठाणे- 74 रुपये
>> नाशिक – 61.90 रुपये
>> नवी मुंबई- 74 रुपये
>> पिंपरी चिंचवड- 79 रुपये
>> धुळे- 61.90 रुपये
>> नागपूर- 109 रुपये

दोन आठवड्यापूर्वीच सीएनजी दरात वाढ
दोन आठवड्यापूर्वीच 3 ऑगस्ट रोजी मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली होती. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ करण्यात आली होती.

राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
>> मुंबई – पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर.
>> पुणे – पेट्रोल 106.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लीटर
>> ठाणे- पेट्रोल 105.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लीटर
>> नाशिक- पेट्रोल 106.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लीटर
>> नागपूर- पेट्रोल 106.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.14 रुपये प्रति लीटर
>> औरंगाबाद- पेट्रोल 106.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लीटर
>> जळगाव- पेट्रोल 107.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लीटर
>> कोल्हापूर- पेट्रोल 106.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.54 रुपये प्रति लीटर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

21 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

7 दिवस ago