महाराष्ट्र

खडकवासल्यात काँग्रेसचा ‘स्वबळाचा’ नारा; सतेज पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी न करता आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी केली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असताना स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर आपल्या तक्रारी मांडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बदलत्या राजकीय भूमिकांमुळे भाजप आणि महायुतीला फायदा होत असून, त्याचा फटका काँग्रेसला बसत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार गटासोबत आघाडी न करता काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या जातील, असे सपकाळ यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपापली भूमिका मांडत असतात. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वर्षे एकत्र लढवल्या आहेत. २०१४ मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते; मात्र त्यानंतर आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याची परंपरा कायम राहिली आहे.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एक नॅचरल अलायन्स म्हणून लढत आले आहेत. स्थानिक पातळीवर काही कुरबुरी असू शकतात. पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर दोघांचा मिळून आकडा वाढला असता, अशी कार्यकर्त्यांची भावना असू शकते,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आघाडीबाबतचे अंतिम आणि धोरणात्मक निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. स्थानिक तक्रारींचे निवारण प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून केले जाईल. मात्र, भाजपच्या विरोधात राज्य आणि देश पातळीवर महाविकास आघाडी मजबूत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आगामी जिल्हा परिषदेसह सुमारे २० ते २२ जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खडकवासल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वबळाची मागणी केली असली तरी आघाडीबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वच घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

12 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

13 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

13 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

13 तास ago