cobra cow
नवी दिल्ली : जगात असे अनेक प्राणी आहेत जे एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. पण, एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गाय वासरासारखी नागाला चाटत आहे, ती अगदी प्रेमाने सापाला चाटते. सापही तिच्यावर हल्ला करत नाही किंवा तिला चावत नाही.
भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नाग आणि गाय यांच्यातील प्रेम दिसत आहे. हे दृश्य खूपच आश्चर्यचकित करणारे आहे. कारण या दोन प्राण्यांमध्ये तुम्ही यापूर्वी असे कधी पाहिले नसेल. व्हिडिओ शेअर करताना सुशांत नंदा यांनी लिहिलं – “या दृश्याचं वर्णन करणं कठीण आहे. हा विश्वास निखळ प्रेमाने जिंकला आहे.”
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एक गाय उभी असून, तिच्या समोरच नाग आहे. नागाने फणा काढला आहे. जगातील सर्वात विषारी सापांमध्ये त्याची तुलना केली जाते. कोब्रा साप अगदी मोठ्या प्राण्यालाही चावला तरी काही मिनिटांतच त्याचा मृत्यू होऊ शकतो. मात्र या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये भांडण नाही तर प्रेम दिसून आले आहे. नागाने फणा काढला असून, समोर असलेली गाय त्याला आपल्या जिभेने चाटत आहे. मात्र, तरीही साप अगदी शांत बसला असून तो हल्लाही करत नाही.
दरम्यान, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, लाखो जणांनी तो पाहिला आहे. शिवाय, अनेकांनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
Video : म्हशीच्या अंगावर थाटात उभा राहून कुत्र्याचा स्वॅग…
टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात; Video Viral…
Video : दुचाकीच्या हेडलाईटमध्ये बसवला टीव्ही अन् लावली गाणी…
Video! किंग कोब्राने घेतला लगेचच बदला…
Video: नवा खिलारी बैल सापडला मगरींच्या तावडीत; चार तास थरार…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…