महाराष्ट्र

नेत्रदान, पर्यावरण संवर्धन आणि योगाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती; राज्यभर NSS चे विशेष अभियान सुरू

मुंबई: विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि निरोगी जीवनशैली रुजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभर विशेष जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.

या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, राज्य राष्ट्रीय सेवा योजना संपर्क अधिकारी डॉ. मिलिंद काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विद्यापीठांचे NSS संचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांसह ६७० हून अधिक प्रतिनिधींनी ऑनलाइन सहभाग नोंदविला.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, नेत्रदान हे मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे सर्वोच्च दान आहे. १० जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त सर्व महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये मरणोत्तर नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असून नेत्रतपासणी आणि नेत्रचिकित्सा शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या अभियानाद्वारे पर्यावरण संरक्षण, हरित आवरण वाढविणे आणि आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व महाविद्यालयांमध्ये योग मार्गदर्शन, योगाभ्यास शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वृद्धिंगत होत असल्याने विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

3 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

3 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

8 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

9 तास ago