महाराष्ट्र

ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका; सुनेत्रा पवार यांचे आश्वासन

मुंबई: ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनता दरबारात भेट घेऊन ॲसिड विक्रीवर कठोर नियंत्रण, प्रभावी देखरेख आणि कडक नियमावली लागू करण्याची मागणी केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी प्रतिनिधींचे म्हणणे आत्मीयतेने ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबारात विविध शिष्टमंडळे, विकासकामांशी संबंधित प्रश्न आणि वैयक्तिक समस्या घेऊन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत अनेक प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी आलोक दीक्षित, ॲड. पूजा मोती तसेच ॲसिड हिंसाचारातून संघर्ष करत नव्याने आयुष्य उभारणाऱ्या महिलांनी निवेदन सादर केले. ॲसिड विक्रीवरील नियंत्रण अधिक प्रभावी करण्याबरोबरच पीडित महिलांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

या महिलांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण समाजाला अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनवणारा असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी महायुती सरकार त्यांच्या सन्मानपूर्ण पुनर्वसन, सक्षमीकरण आणि सुरक्षित समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. आवश्यक त्या सकारात्मक उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

1 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

5 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

5 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

5 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

5 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

6 तास ago