महाराष्ट्र

मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी; महाविकास आघाडीचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

या शिष्टमंडळात हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, आदित्य ठाकरे, अनिल परब, राजेश टोपे, डॉ. विश्वजीत कदम, धैर्यशील पाटील, अंबादास दानवे, रईस शेख, सचिन सावंत, शिवराज मोरे, संदेश कोंडविलकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन तसेच महाविकास आघाडीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, पात्र मतदारांची नावे अन्यायकारकरीत्या वगळली जाणार नाहीत याची खात्री करावी तसेच बनावट व दुबार नोंदींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. ग्रामीण, आदिवासी, स्थलांतरित, वंचित आणि दुर्बल घटकांतील मतदारांना कोणत्याही तांत्रिक कारणामुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याची मागणीही करण्यात आली.

यासोबतच मतदान केंद्रांचे नियोजन, मतदान यादीतील त्रुटी दुरुस्ती, बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे कामकाज, मतदार नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळावी याबाबतही निवडणूक आयोगासमोर विविध मुद्दे मांडण्यात आले. लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घ्यावी, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

10 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

14 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

14 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

14 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

14 तास ago