महाराष्ट्र

शाळेत ने-आण करणाऱ्या व्हॅन चालकाचे नऊ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य

छत्रपती संभाजीनगर: तीन वर्षांपासून मुलांची शाळेत ने-आण करणाऱ्या व्हॅन चालकाने नऊ वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केले. दोघे बाहेर फिरायला जाऊ, तू आईवडिलांना घरी येण्यास उशीर होणार असल्याचे सांग, असे म्हणत हात पकडला.

विशेष म्हणजे, पोलिस आयुक्तालयाने दडपण्याचा प्रयत्न केलेली ही संतापजनक घटना पोलिसांची विद्यार्थी सुरक्षा मोहीम सुरू असताना ३१ जुलै रोजी घडली. गणेश संपत शिंदे (३४, रा.आंबेडकरनगर) असे आरोपी चालकाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली.

नऊ वर्षांची मुलगी हर्सूल टी पॉइंट येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. शाळेत तीन वर्षांपासून गणेशच्याच व्हॅनने ती जाते. ३० जुलै रोजी मात्र दुपारी २ वाजता घरी व्हॅनमधील सर्व मुले उतरल्यानंतर घरापासून काही अंतरावर व्हॅन थांबवत गणेशने तिचा हात पकडला. ‘तू खूप क्युट आहेस, उद्या आपण दोघे फिरायला बाहेर जाऊ, तू घरी तुझ्या आईवडिलांना सांग शाळेतून येण्यास उशीर होणार आहे,’ असे म्हणाला. या घटनेमुळे मुलगी प्रचंड घाबरून गेली. सावरून ती सीटवरच मागे सरकली. त्यानंतर, गणेशने तिला घरी सोडत हा प्रकार कोणाला सांगू नको, असेही बजावले.

दिवसभर शांत, विश्वासात घेतल्यावर रडतच सांगितले

घरी गेलेली मुलगी दिवसभर शांत होती. त्यामुळे आईवडिलांना संशय आला. रात्री १० वाजता आईने तिला विश्वासात घेतल्यावर तिने गणेशच्या कृत्याविषयी सांगितले. संतप्त आईवडिलांनी तातडीने शाळेला संपर्क साधला. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर, गणेशवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

कंत्राटदार एक, चालविणारा दुसराच

कुटुंबाने शाळेला संपर्क केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडे चालकाचा क्रमांकच नव्हता. व्यवस्थापनाने कंत्राटदाराचा क्रमांक असल्याचे सांगितले. त्याने विद्यार्थ्यांच्या व्हॅनचा कंत्राट घेतला असून, विविध चालकांना काम दिल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

7 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

7 तास ago

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

1 दिवस ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

2 दिवस ago