महाराष्ट्र

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा

मुंबई: भारतीय जनता पक्ष व असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदु मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात. हिरव्या पतंगाचा मांजा भगवा आहे तर धनुष्याचा बाण हिरवा आहे. या ढोंगी भाजपा, शिंदेसेना व एमआयएमला महानगरपालिका निवडणुकीत धडा शिकवा व काँग्रेसला बहुमताने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

महानगरपालिका निवणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूरात प्रचार केला. यावेळी विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर आडबाले, माजीमंत्री वसंत पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संतोष लहानगे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व ओवैसी यांचा एमआयएम पक्ष दोघेही हिंदू मुस्लीमच्या नावावर लोकांमध्ये दहशत माजवत आहेत पण सत्तेची मलई खाण्यासाठी मात्र एकत्र येतात हे दिसून आले आहे. अकोट मध्ये भाजपा व एमआयएम सत्तेसाठी एक झाले. एमआयएमशी युती कधीच करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छाती ठोकून सांगतात पण अकोटमधील युती काही तोडत नाहीत व त्यांच्यावर कारवाईही करत नाहीत, कारण हे दोन्ही पक्ष एकच आहेत. या सत्तेच्या साठमारीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही मागे नाही, त्यांनीही बीड जिल्ह्यात परळी नगरपालिकेत एमआयएमचा हात हाती घेतला. जनतेमध्ये दहशत माजवून सत्तेसाठी गळ्यात गळे घालणाऱ्या या ढोंगी लोकांना आता धडा शिकवा, असे आवाहन करताना सपकाळ म्हणाले की, “तू इधर उधर की न बात कर, मुझे रहज़नों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है”.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसने ७० वर्षात काय केले असा प्रश्न विचारणारा भाजपा काँग्रेसने जे निर्माण केले आहे ते विकण्याचे काम करत आहेत. चंद्रपूर शहरात रस्त्यावर सगळीकडे खड्डे आहेत, पाणी मिळत नाही शहराची अवस्था अत्यंत वाईट केली आहे. पराभव दिसत असल्याने भाजपा तीन तीन हजारांची पाकिटे वाटत आहे. चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता आल्यास शहरात सुसज्ज रुग्णालये उभारु, किमान १० इंग्रजी शाळा सुरु करु, पिण्याच्या पाणी मुबलक देऊ. जनता काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे, चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे ४० नगरसेवक विजयी होतील व महानगरपालिकेवर काँग्रेस विजयी झेंडा फडकणार असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago