महाराष्ट्र

माजी जवानाचा आदर्श; दुग्धव्यवसायातून वर्षाला ७ ते ९ लाखांचे उत्पन्न

मायणी: नोकरीनंतरही शेतीकडे वळून यश संपादन करणाऱ्यांची अनेक उदाहरणे आहेत. त्यात मायणी येथील सचिन आनंदराव माने-पाटील यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सैन्यात २० वर्षे सेवा पूर्ण करून हवालदार पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी इतरत्र नोकरी करण्याऐवजी शेतीसोबत गायी पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्यातून वर्षाला सात ते नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.

सचिन माने-पाटील यांनी सैन्य दलात दोन दशके कर्तव्य बजावताना जम्मू-काश्मीर, लडाख, श्रीनगर, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आदी ठिकाणी सेवा दिली. हवालदार पदावरून सेवानिवृत्तीनंतर ते गावी परतले. आई-वडील पारंपरिक शेती करत असल्याने शेतीत काहीतरी नवीन करण्याची जिद्द त्यांनी मनाशी बाळगली आणि शेतीबरोबर पशुधन पाळण्याचा निर्णय घेतला.

साध्या गोठ्यातून मोठे उत्पादन

सुरुवातीला साध्या पद्धतीने गायींसाठी गोठा उभारण्यात आला. सध्या त्यांच्या गोठ्यातून रोज सकाळ-संध्याकाळ मिळून सुमारे ८० ते ९० लिटर दूध उत्पादन होत आहे. गायीच्या दुधाला सध्या लिटरमागे ३५ ते ४० रुपये दर मिळत असून, दररोज साधारण दोन ते तीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. यामुळे वर्षाकाठी सरासरी सात ते नऊ लाख रुपये दुग्धोत्पादनातून मिळत आहेत.

शेणखताचा अतिरिक्त फायदा

दुधाबरोबरच गायीपासून मिळणारे शेणखतही फायदेशीर ठरत आहे. शेणखतातून गायींच्या चाऱ्याचा खर्च मोठ्या प्रमाणात भागतो. त्यामुळे खाद्यावरील खर्च कमी होत असून, एकूण व्यवसाय अधिक फायदेशीर ठरत आहे. शेतीबरोबर दुग्धव्यवसाय केल्याने आर्थिक स्थिरता मिळाल्याचे माने-पाटील सांगतात.

तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश

“सेवानिवृत्तीनंतर आठ-दहा तास इतरत्र नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतीत तेवढे कष्ट घेतले तर अधिक उत्पादन मिळू शकते. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीबरोबर जोडधंदा केल्यास कुटुंबाची आर्थिक सुधारणा होते आणि समाजात प्रतिष्ठाही मिळते,” असे मत सचिन माने-पाटील यांनी व्यक्त केले.

थकीत उसाची बिले शेतकऱ्यांना व्याजासह मिळणार

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत उसाची बिले शेतकऱ्यांना व्याजासह देण्यात येणार असून, संबंधित साखर कारखान्यांकडून सुमारे १० कोटी रुपयांची बँक गॅरंटी घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

9 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

9 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

9 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

9 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

9 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

9 तास ago