मुंबई: भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “माझे नालंदा विद्यापीठ” असे संबोधत केलेल्या भाषणावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या वक्तव्यावर घणाघाती टीका करत याला “ज्ञानाचा अपमान आणि चापलुसीचा अतिरेक” असे संबोधले आहे.
टीकाकारांच्या मते, नालंदा हे प्राचीन भारतातील ज्ञान, चिंतन आणि बौद्धिक परंपरेचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक संदर्भाचा वापर करून व्यक्तिपूजेला चालना देणे ही “विचारांची पातळी खालावल्याचे लक्षण” असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राज्यात बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि महागाईसारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारने लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत विरोधकांनी म्हटले आहे की, “जनतेच्या प्रश्नांवर भाष्य करण्याऐवजी नेत्यांची स्तुती करण्यात वेळ घालवणे हे तरुण नेतृत्वाला शोभणारे नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कडूनही या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला असून, “महाराष्ट्रातील तरुण आता जागरूक आहे. तो विचार करतो, प्रश्न विचारतो आणि पोकळ स्तुतीला बळी पडणार नाही,” असे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, महाडिक यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…