औरंगाबाद: तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकार या महिन्यामध्ये 13 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे. या फेब्रुवारी महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे 2 हजारे रुपये देण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2015 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा देशातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. सरकारकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येते.
केंद्र सरकारकडून या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पात्रता तपासणी केली जात आहे. कारण या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी थेट त्यांच्या बँक खात्यात एका आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली जाते. पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो.
अशी पाहा संपूर्ण लिस्ट…
पहिल्यांदा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ओपन करुन होम पेजवर फार्मर कॉर्नरवर जावे लागेल.
नंतर फार्मर कॉर्नरमध्ये लाभार्थी लिस्टच्या लिंकवर क्लिक करा.
या प्रक्रियेनंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाची माहिती टाका.
सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण लिस्ट येईल.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…