महाराष्ट्र

शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

संभाजीनगर: राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी ४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ०.४० हेक्टरपासून ते ६ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये विहीर, वीजजोडणी, पंपसंच, शेततळे, सोलरपंप, ठिबक सिंचन यांसारख्या सुविधा मिळणार आहे.

योजनेचा उद्देश

अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत

शेतीत कायमस्वरूपी सिंचन सुविधा

शेतीचे उत्पन्न वाढवणे.

अनुदान घटक व रक्कम

नवीन विहीर – ₹4,00,000

जुनी विहीर दुरुस्ती – ₹1,00,000

इनवेल बोअरिंग – ₹40,000

वीज जोडणी – ₹20,000

पंप संच – ₹40,000

सोलर पंप – ₹50,000

शेततळ्याला प्लॅस्टिक अस्तरीकरण – ₹2,00,000

ठिबक सिंचन – ₹97,000

तुषार सिंचन – ₹47,000

PVC/HDPE पाईप – ₹50,000

परसबाग – ₹5,000

बैल/ट्रॅक्टर यंत्रसामग्री – ₹50,000 पर्यंत

पात्रता निकष

शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध असावा

७/१२ आणि ८अ उतारा आवश्यक

जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते (आधार लिंक)

दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य

0.40 ते 6 हेक्टर शेती (विशेष बाबतीत अट लागू नाही)

एकदा लाभ घेतल्यावर 5 वर्षे पुन्हा लाभ नाही

जुनी विहीर असल्यास 20 वर्षांनंतरच दुरुस्तीचे अनुदान मिळेल

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक पासबुक (आधार लिंक)

शेतकरी ओळख प्रमाणपत्र

शेतकऱ्याचा फोटो

जमीन नकाशा (हवे असल्यास)

संयुक्त करारपत्र (लहान जमीन असल्यास)

स्वयंघोषणा पत्र (जर इतर योजनांचा लाभ घेतला नसेल)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

14 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago