महाराष्ट्र

शेतकर्‍यांनो हे ओळखपत्र नसेल तर 12 हजार रुपये मिळणार नाही

Farmer ID काढण्यास फक्त उद्याचा दिवस बाकी

औरंगाबाद: तुम्ही शेतकरी असाल आणि अजून ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (Farmer ID) काढलेला नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण १५ एप्रिलपासून ‘शेतकरी आयडी’शिवाय तुम्हाला कोणतीही कृषी योजना मिळणार नाही म्हणजेच, पीएम किसान सन्मान निधी (₹६,०००) आणि नमो शेतकरी महासन्मान निधी (₹६,०००) – वर्षाला एकूण ₹१२,००० रुपयांपासून तुम्ही वंचित राहू शकता.
अजूनही ७० लाख शेतकरी आयडीपासून वंचित
राज्यात १.७१ कोटी नोंदणीकृत शेतकरी आहेत, त्यापैकी फक्त १ कोटी शेतकऱ्यांनीच आतापर्यंत हा आयडी घेतला आहे. म्हणजेच, तब्बल ७० लाख शेतकरी अजूनही धोका पतकरत आहेत.
शेतकरी आयडी म्हणजे काय?
हा आयडी केंद्र सरकारच्या ‘AgriStack’ उपक्रमाचा भाग आहे. यात शेतकऱ्यांचे जमीन अभिलेख, पीक माहित, जनावरे आणि सरकारी लाभ यांचा डिजिटल डेटा एकत्र केला जातो. आधार क्रमांकाशी जोडून हा एक एकत्रित ओळखपत्र बनवला जात आहे.
शेतकरी आयडीशिवाय कोणत्या योजना थांबणार
पीएम किसान सन्मान निधी
नमो शेतकरी महासन्मान निधी
पिक विमा योजना
महाडीबीटीवरील सर्व योजना
पोक्रा योजना
नैसर्गिक आपत्ती अनुदान
पीक कर्ज सुविधा
आखेरची संधी: १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करा
मुळात यासाठीची शेवटची तारीख ३१ मार्च होती, पण आता शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे तुमच्या नजीकच्या ग्राम कृषी समिती, CSC केंद्र किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क करून त्वरित नोंदणी करा.
तुम्ही अजून वाट पाहताय का
तुमच्या वर्षाला मिळणाऱ्या १२,००० रुपयांचा फटका टाळायचा असेल, तर आजच शेतकरी आयडीसाठी अर्ज करा. फक्त ३ दिवस उरलेत.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

16 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

20 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

20 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

20 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

20 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

20 तास ago