शेतकर्‍यांनो हे ओळखपत्र नसेल तर 12 हजार रुपये मिळणार नाही

महाराष्ट्र

Farmer ID काढण्यास फक्त उद्याचा दिवस बाकी

औरंगाबाद:  तुम्ही शेतकरी असाल आणि अजून ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (Farmer ID) काढलेला नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण १५ एप्रिलपासून ‘शेतकरी आयडी’शिवाय तुम्हाला कोणतीही कृषी योजना मिळणार नाही म्हणजेच, पीएम किसान सन्मान निधी (₹६,०००) आणि नमो शेतकरी महासन्मान निधी (₹६,०००) – वर्षाला एकूण ₹१२,००० रुपयांपासून तुम्ही वंचित राहू शकता.
अजूनही ७० लाख शेतकरी आयडीपासून वंचित
राज्यात १.७१ कोटी नोंदणीकृत शेतकरी आहेत, त्यापैकी फक्त १ कोटी शेतकऱ्यांनीच आतापर्यंत हा आयडी घेतला आहे. म्हणजेच, तब्बल ७० लाख शेतकरी अजूनही धोका पतकरत आहेत.
 शेतकरी आयडी म्हणजे काय?
हा आयडी केंद्र सरकारच्या ‘AgriStack’ उपक्रमाचा भाग आहे. यात शेतकऱ्यांचे जमीन अभिलेख, पीक माहित, जनावरे आणि सरकारी लाभ यांचा डिजिटल डेटा एकत्र केला जातो. आधार क्रमांकाशी जोडून हा एक एकत्रित ओळखपत्र बनवला जात आहे.
शेतकरी आयडीशिवाय कोणत्या योजना थांबणार
पीएम किसान सन्मान निधी
नमो शेतकरी महासन्मान निधी
पिक विमा योजना
महाडीबीटीवरील सर्व योजना
पोक्रा योजना
नैसर्गिक आपत्ती अनुदान
पीक कर्ज सुविधा
आखेरची संधी: १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करा
मुळात यासाठीची शेवटची तारीख ३१ मार्च होती, पण आता शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे तुमच्या नजीकच्या ग्राम कृषी समिती, CSC केंद्र किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क करून त्वरित नोंदणी करा.
तुम्ही अजून वाट पाहताय का
तुमच्या वर्षाला मिळणाऱ्या १२,००० रुपयांचा फटका टाळायचा असेल, तर आजच शेतकरी आयडीसाठी अर्ज करा. फक्त ३ दिवस उरलेत.